भवई सिनेमाच्या ट्रेलरवरून वाद का पेटला?

Published

स्कॅम वेब सीरिज मधील प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी याचा ह 'भवई' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. याचं कारण म्हणजे या चित्रपटातल्या रावणाच्या पात्राचे सितेच्या पात्रासोबत प्रेमसंबंध असल्याचं दाखवलं गेलंय.

या चित्रपटाचं आधीचं नाव 'रावणलीला' होतं. विरोधानंतर ते बदलून 'भवई' करण्यात आलं. मात्र तरीही अनेकांनी चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप नोंदवलाय. सोशल मीडियावर आरोप करताना लोकांचं म्हणणं असं आहे की, चित्रपटात रावणाचं उदात्तीकरण करण्यात आलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )