कोरोना काळात आरोग्यसेवकांकडे सरकारचं दुर्लक्ष झालं का?
कोरोना व्हायरसचा सगळ्यांत जास्त फटका बसलेल्या देशांमध्ये एक भारत देश आहे. कारण, आतापर्यंत देशात कोव्हिडमुळे आतापर्यंत देशात कोव्हिडमुळे 4,43,213 लोकांचा मृत्यू झालाय. आणि 33 कोटींपेक्षा जास्त लोकांना या विषाणूचा संसर्ग झालाय.
या आरोग्य संकटाचा सामना करण्याचं मोठं आव्हान आपल्या आरोग्य यंत्रणेसमोर होतं आणि आहे. यातल्या काहींना तर कोव्हिड रुग्णांची सेवा करताना मृत्यूला जवळ करावं लागलं.
असं असताना, केंद्र सरकारकडे मात्र या आरोग्यसंकटाच्या काळात कोव्हिड होऊन मरण पावलेल्या आरोग्य सेवकांचा निश्चित आकडाच नाहीये.
असा आकडा उपलब्ध असेल तरंच सरकारी मदत कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकेल ना! आरोग्य सेवक आणि डॉक्टरांसाठी सरकारची कुठली योजना होती, त्यांच्याविषयी ठोस माहिती सरकारकडे का नाही या प्रश्नांचा बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी वेध घेतला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)