बुलबुल राय : 'मी फुटपाथवर राहणाऱ्या कॅन्सर रुग्णांना मदत करते'
मुंबईत परेलला रस्त्यालगतच्या फूटपाथवर स्वेटर आणि कपडे विकणारे लोक दिलतात. बुलबुल राय देखील असेच कपडे विकतात. लहानपणी त्यांचे वडील कॅन्सरमुळे गेले. तेव्हापासून बुलबुल यांना कॅन्सर पेशंट्साठी मदत करायची इच्छा होती.
परेलच्या टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येणारे इशान्य आणि पूर्वेकडील राज्यातले अनेक पेशंट हिंदी बोलू शकत नाहीत. पेशंटससोबतच्या नातेवाईंकांच्या राहण्याचाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे टाटा हॉस्पिटलच्या अवतीभोवती खूप सारे पेशंट्स, नातलग फूटपाथवर राहतात. अशा गरजूंना बुलबुल गेली 15 वर्ष मदत करतायत.
शूट आणि रिपोर्ट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटिंग- राहुल रणसुभे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)