लॉकडाऊनमुळे ‘या’ मुलींवर आली शिक्षण बंद करण्याची वेळ
कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यावर मागचे सतरा महिने मुलं शाळेत गेलेली नाहीत. थोड्याफार फरकाने देशभर ही परिस्थिती आहे.
पण, त्यामुळे खेड्यात राहणारी आणि खासकरून गरीब घरातली मुलं आणि त्यातही मुली शिक्षणाला मुकतील की काय अशी भीती निर्माण झालीय.
कारण, ऑनलाईन शिक्षक परवडत नाही किंवा ते उपलब्धही नाही यामुळे अनेकांनी शाळा मागच्या दीड वर्षांत बंद होती. आणि त्यामुळे अभ्यासक्रमात मागे पडून या मुलांना शालेय अभ्यासक्रमाबद्दल भीती वाटू लागली आहे.
एक खेडेगाव, मध्यम आकाराचं गाव आणि महानगर असा तीन ठिकाणच्या मुलांचं वास्तव या रिपोर्टमध्ये मांडलंय बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)