तालिबान : काबूलहून 168 जणांना घेऊन वायूदलाचं विमान भारतात परतलं

व्हीडिओ कॅप्शन, काबूलहून 168 जणांना घेऊन वायूदलाचं विमान भारतात परतलं
Published

अफगाणिस्तानात अडकलेल्या 168 नागरिकांना घेऊन भारतीय वायूदलाचं C-17 हे विमान रविवारी (22 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास भारतात परतलं.

दिल्लीजवळील गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हे विमान उतरवण्यात आलं. या विमानातून 107 भारतीय नागरिकांसह एकूण 168 जण भारतात दाखल झाले.

तत्पूर्वी, आजच ताजिकिस्तानहून 87 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान नवी दिल्ली विमानतळावर पोहोचलं. यामध्ये दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश होता. विमानतळाबाहेर पडण्याआधी या सर्व प्रवाशांना कोव्हिड चाचणी करून घ्यावी लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)