पाकिस्तानची झाहरा याकूब कशी बनली सोशल मीडिया स्टार?
झाहरा याकूब 23 वर्षांची आहे. तिची उंची दोन फूट आहे. ती जन्मतःच हाडांच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. सध्या तिच्या आजारावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. पण तिला सध्या समाजाच्या नकारात्मक दृष्टीकोनाला आणि आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतंय.
झाहरा एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती तिच्या मेकअप आर्ट आणि प्रेरणादायी संभाषणांसाठी इन्स्टाग्रामवर लोकप्रिय आहे.
झाहरा तिची सर्व कामं तिच्या दोन खोल्यांच्या घरात एकाच बेडवर करते. इंस्टाग्रामवर 45 हजारांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. काही लोक तिच्या फोटोंवर नेगेटिव्ह कॉमेंट्स करतात. ती नेगेटिव्ह कॉमेंट्सची पर्वा करत नाही. ती तिच्या भाषणांमध्ये अशा वर्तनाबद्दल बोलूनही दाखवते.
झाहराला प्राथमिक शिक्षण घरीच मिळालं. झाहराला तिच्यासारख्या लोकांसाठी आरोग्य सेवा पुरवणारी एक कल्याणकारी संस्था सुरू करायची आहे. झाहराला प्रेरणादायी वक्ता व्हायचं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)