राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी अफगाणिस्तानातून असे पळाले

Published

अफगाणिस्तानवर आता कट्टरतावादी संघटना तालिबानने संपूर्ण ताबा मिळवलाय. देशाची राजधानी काबूलमध्ये शिरून त्यांनी देशाची सत्ता ताब्यात घेतलीय आणि अफगाणिस्तान आम्ही जिंकलं असून अफगाणिस्तानविरुद्धचं युद्ध संपल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह यांनी देश सोडला आहे. तालिबाननं गेल्या 10 दिवसात अफगाणिस्तानातील बहुतांश महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला होता. त्यामुळे अशरफ घनी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)