तालिबान आल्यानंतर काबूलमध्ये गोंधळाची स्थिती
अफगाणिस्तानातल्या काबूल विमानतळावरचं हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. एखाद्या विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी तपासयंत्रणांच्या अनेक चौक्या आणि अत्याधुनिक तपास यंत्रांमधून वाट काढावी लागते. मात्र, या विमानतळावर एखाद्या रेल्वेत शिरण्यासाठी होणारी गर्दी विमानाभोवती पाहायला मिळतेय.
अफगाणिस्तानाच्या विमानतळावरचं हे दृश्य तालिबानच्या सत्तेतल्या पुनरागमनानंतरचं चित्र कसं असेल याचाचं द्योतक असल्याचं बोललं जातंय. काबूल शहर तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर शहरात सगळीकडे असंच दृश्य आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)