You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात मंदिराच्या तोडफोडीनंतर 80 कुटुंबांच्या मनात भीतीचं सावट
पाकिस्तानच्या रहीम यार खान जिल्ह्यात मुस्लीम जमावाने हिंदू समुदायाच्या मंदिराची तोडफोड केली. जिथे ही घटना घडली त्या भोंग भागातील अल्पसंख्याक हिंदू समाज भीतीने आपली निवासस्थानं सोडून निघून जातोय. बीबीसी उर्दूच्या टीमने स्थानिक हिंदू लोकांसोबत बोलून या घटनेविषयी जाणून घेतलं. या भागात जवळपास 80 हिंदू कुटुंब राहतात. ‘ईश्वरनिंदे’च्या आरोपावरून हा हल्ला झाल्याची माहिती आहे, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)