गुन्हेगारांना सुधारण्यासाठी नाशिक पोलिसांचा नवा उपक्रम

Published

किरण वाघमारेंचं आयुष्यात एकच स्वप्न होतं. पोलीस खात्यात भर्ती होणं. पण तरुण वयात हातातून झालेल्या गुन्ह्यामुळे त्यांच्यावर गुन्हेगाराचा शिक्का बसला तो कायमचाच.

असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी मिळते. नाशिकमधल्या अनेक गुन्हेगारांना ती संधी इथलं पोलीस खातंच देतंय.

शहरातल्या ज्या गुन्हेगारांना सुधारण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचं बंधपत्र घेतलं जातं आणि त्यांना मदत केली जाते.

आजवर अशा 366 गुन्हेगारांकडून बंधपत्र लिहून घेतलेलं आहे. पुढेही अशी संधी गुन्हेगारांना देण्यात येणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)