चिपळूणमधील पोसरे गावावर दरड कोसळल्यानंतर तिथल्या लोकांचं काय झालं?

Published

22 जुलैला संपूर्ण कोकणात पावसाने थैमान घातलं होतं. पूर, दरड कोसळण्याच्या बातम्या वारंवार कानी पडत होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पोसरे खुर्द गावात 8 घरांवर दरड कोसळली. 17 जण या दरडीखाली गाडले गेले. एनडीआरफने 16 मृतदेह बाहेर काढले. एक वयस्कर महिला अद्याप बेपत्ता आहे.

त्या महिलेच्या कुटुंबीयांच्या सहमतीने रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं आणि तिला मृत घोषित केलंय. आपलं माणूस गेल्यानंतर ते पाहायलाही मिळू नये इतर दुःखद प्रसंग मोहिते कुटुंबावर पसरलाय.

सरकारी मदतीचे धनादेश या गावातल्या लोकांना मिळाले आहेत. मात्र, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर या दरडींखाली कायमचं गाडलं गेलंय.

कुटुंबातले गेलेले नातेवाईक आणि नसलेलं घर अशा दुहेरी या लोकांना सामना करावा लागतोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)