You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सांगलीमध्ये 'त्या' जोडप्याने लग्नानंतर पुराच्या पाण्यातून गृहप्रवेश का केला?
आपला लग्नसोहळा अनोखा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण गावात पूर आला असताना असं काही करणं हे तसं दुरापास्तच. सांगलीच्या रोहित सूर्यवंशी आणि त्यांच्या नववधू सोनाली सूर्यवंशी यांनी पुराच्या स्थितीतही हे जमवून आणलं. या रोहित सूर्यवंशी यांनी आपल्या नववधूचा गृहप्रवेश चक्क बोटीतून केला.
त्याचं झालं असं की, सांगलीला 2-3 दिवस पुराने वेढा दिला होता. पण रोहित यांना याकाळातही आपल्या लग्नाचा मुहूर्त चुकवायचा नव्हता. मग काय? लग्न तर झालं. पण पुराच्या पाण्याने वेढलेल्या घरात नववधू न्यायची कशी? हा प्रश्न उभा राहिला. रोहित यांनी शक्कल लढवत पत्नी सोनालीला चक्क बोटीतून घरात आणलं.
कारण लग्नस्थळावरून घरी पोहोचायच्या मार्गावर पुराचं खूप पाणी साठलं होतं. रोहित आणि सोनाली यांचा हा गृहप्रवेश सांगलीमध्ये सगळीकडे प्रसिद्ध झाला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)