You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र पाऊस: सांगलीकरांना पुरानंतर होतोय आता मगरींचा त्रास
पुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागतंय. पुराचं पाणी ओसरत असलं तरी या पाण्यासोबत मगरी दिसू लागल्या आहेत.
कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. यातल्या काही मगरी जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये घरांच्या छतावर, जमिनीवर दिसतायत.
पाऊस थांबल्यावर ऊब घेण्यासाठी या मगरी पाण्याबाहेर येत असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे. वनविभागाकडून मगरींबाबत माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागरिकांनी मगरींसोबत फोटो काढण्याचे किंवा त्यांना घाबवरण्याचे प्रकार करू नयेत अशी विनंतीही वनविभागाकडून करण्यात आलीय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)