रत्नागिरी पूर: तिवरे धरण दोन वर्षांपूर्वी ज्या गावात फुटलं होतं, आता तिथेच दरडी कोसळतायत

Published

रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे गावाला पावसाचा जबर तडाखा बसलाय. दोन वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे इथलं तिवरे धरण फुटलं होतं. त्यावेळी काहींना जीवही गमवावा लागला होता.

सध्या गावातील 6 ठिकाणी भूस्खलन झाल्याने गावकरी धास्तावले आहेत. इथल्या डोंगराच्या वरील भागास मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे इथल्या फणसवाडीसह गावातील 100 घरांना धोका निर्माण झालाय.

पुराच्या पाण्यात तिवरे भेंदवाडीतील पूलही वाहून गेला आहे. तिवरे गावात जाणारे इतर पूल वाहून गेल्याने प्रशासनाला गावात पोहोचायला अडचणी येतायत. सध्या गावकऱ्यांचं गावातल्या समाज मंदिरात स्थलांतर करण्यात आलंय.

रिपोर्ट - मुश्ताक खान

एडिटिंग - राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)