टोकियो ऑलिम्पिकमध्ये यंदा पहिल्यांदाच उतरली निर्वासित ॲथलीटची टीम
अफगाणिस्तानचा तायक्वांडोपटू अब्दुल्ला सिद्दिकीची कहाणी विलक्षण आहे. देशात टोळ्यांकडून सतत झालेल्या हल्ल्यांमुळे त्याने देश सोडला. रोज पंधरा तासांचा पायी प्रवास करून बेल्जियम गाठलं. आईबरोबर त्याची कायमची ताटातूट झाली.
पण तायक्वांडोच्या प्रेमापोटी हे सगळं सहन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल मिळवण्याची मजल मारली. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो सहभागी झाला आहे. इथंही मेडल मिळवून गेल्यावर्षी कोव्हिडने मृत झालेल्या आईला त्याला श्रद्धांजली द्यायची आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)