कोरोना काळात गाडीच्या बोनेटवर प्रवास करणाऱ्या नवरीवर का दाखल झाला गुन्हा?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना काळात गाडीच्या बोनेटवर प्रवास करणाऱ्या नवरीवर का दाखल झाला गुन्हा?
Published

हा व्हीडिओ पुणे – सासवड मार्गावरील दिवे घाटातला आहे. 13 जुलैला स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेटवर बसून एक नवरी लग्नमंडपाकडे जात होती.

पण घाटातून असा प्रवास करणं धोकादायक आहे. तसंच कोरोनाकाळात नवरी मुलगी आणि गाडीतील इतर लोक मास्क न घालता प्रवास करत होते.

त्यामुळे नियमांचं उल्लघन झाल्याने पोलिसांनी नवऱ्या मुलीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर गाडीचे चालक श्याम लवांडे, हा व्हीडिओ शूट करणारे तुकाराम शेडगे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे कृत्य का केलं? हे समजलं नसलं तरी ते करताना अविचार आणि हयगय केल्याचं पोलिसांनी गुन्हा दाखल करताना एफआयआरमध्ये नोंदवलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)