नाशिक: कांदा लिलावात भाग घेणारी एकमेव महिला व्यापारी - साधना जाधव
विंचूरच्या कृषी उत्त्पन्न बाजार उपसमितीत कांदा खरेदी करणारी एकच महिला दिसून येते. त्या म्हणजे साधना जाधव.
शेतीमाल खरेदी, विक्री आणि विपणन क्षेत्रात बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या महिलांपैकी त्या एक आहेत. साधना कृषीसाधना ही महिला सहकारी संस्था चालवतात.
साधनाताईंनी अनेक अशी काम केली जी महिला कधीच करत नाहीत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची कंत्राट घेतली, त्या सध्या नाफेडसाठी कांदा खरेदी करतात.
पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या कित्येक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
रिपोर्ट आणि शूट - अनघा पाठक
एडिटिंग - शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)