You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठिंबा का दिला होता?
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 'महाविकास आघाडी'चं सरकार येणं यामागचं न पुसता येणारं एक कारण 46 वर्षांपूर्वी देशात लागलेली आणीबाणी आहे.
ती नसती, तर कदाचित शिवसेना आणि काँग्रेसला विरुद्ध ध्रुवांवरच्या राजकीय विचारधारा असून एकत्र येण्याच्या समान धागा सापडणं कठीण होतं. 46 वर्षांपूर्वी या दोन्ही पक्षांच्या अगोदरच्या पिढ्यांनी जणू या धाग्याची तजवीज करुन ठेवली होती, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीच्या मुद्यावरुन इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता.
जेव्हा काँग्रेस विरुद्ध देश अशी विभागणी झाली होती, संसद स्थगित होऊन सर्व अधिकार एकहाती एकवटले होते, अनेक राजकीय आणि वैचारिक विरोधक तुरुंगात डांबले गेले होते, तेव्हा हा निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधींच्या बाजूनं जे मोजकेच उभे होते, त्यात बाळासाहेब आणि शिवसेना होते. धर्मनिरपेक्षता हे मूळ तत्व सोडून काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा कसा देईल अशा मोठ्या राजकीय पेचात सोनिया गांधी असतांना, शरद पवारांनी त्यांना आणीबाणीची आठवण करुन दिली आणि...
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)