You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वटपौर्णिमा : पुणे स्वारगेटच्या या वडाच्या झाडाखाली होता एसटीचा पहिला थांबा
पुण्यातल्या स्वारगेटचं हे वडाचं झाड अगदी खास आहे, कारण हेच झाड पहिल्या एसटीचा अंतिम थांबा होतं. 1 जून 1948 रोजी अहमदनगर ते पुणे अशी पहिली एसटी धावली होती. तेव्हा हे वडाचं झाड पुण्यात स्टेशन म्हणून ठरवण्यात आलं होतं.
म्हणून याच झाडाखाली एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. वेगवेगळ्या शहरांची, गावांची नावं असलेल्या पाट्या या झाडाला लावण्यात आल्या आहेत. झाडाचा आकारमान आणि मिळणाऱ्या सावलीमुळे थांब्यासाठी हे झाड निवडलं गेलं असावं, असं सांगितलं जातं.
रिपोर्ट - राहुल गायकवाड
कॅमेरा - नितीन नगरकर
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)