UFO : आकाशात तरंगणाऱ्या अनोळखी वस्तुंचा लवकरच शोध लागणार

Published

2017 मध्ये अमेरिकेन नेव्ही फायटर जेटला ही हवेत उडणारी एक अनोळखी वस्तू (UFO) आढळली होती. पेटॅगॉन याला एक unidentified aerial phenomenon म्हणजेच ‘अनोळखी हवाई घटना’ असं म्हणत आहे.

लेफ्ननंट कमांडर ॲलेक्स डेट्रिच या गेल्या 10 वर्षांपासून फायटर पायलट म्हणून काम करत आहेत. त्या तेव्हा इतर 3 पायलट सोबत रुटीन ट्रेनिंग फ्लाईट चालवत होत्या.

तेव्हा त्यांना दक्षिण कॅलिफोर्नियाजवळच्या समुद्रावर हवेत धावणारी एक वस्तू आढळली. तेव्हा अमेरिकेच्या संरक्षण खात्याने हे फुटेज अधिकृतरित्या प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर UFO विषयीचे विचार पूर्णपणे बदलले.

आतापर्यंत हॉलिवूडच्या सिनेमामध्ये या गोष्टी दाखवल्या जायच्या. आता अमेरिकेत एक मिलिटरी टास्क फोर्स स्थापन केला आहे. तो या सगळ्या घटनांची चौकशी करत आहे. हा रिपोर्ट लवकरच प्रसिद्ध होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी प्रतिनिधी सोफी लाँग यांचा खास रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)