You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Cristiano Ronaldo च्या नंतर पोग्बाने हटवली बीअरची ब्रॅंडची बाटली
पोग्बानं प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात झाली, तेव्हा हाईनकाईन या बीयर ब्रँडच्या अल्कोहोलविरहित पेयाची बाटली बाजूला केली आणि लोकांना पाणी प्यायला प्रोत्साहन दिलं. त्याचा हा व्हीडियो व्हायरल झाला आहे.
पोग्बानं फक्त agua (पाणी) एवढाच शब्द उच्चारला, आणि फार काही बोलण्यास नकार दिला. 28 वर्षांचा पोग्बा फ्रान्ससाठी खेळतो आणि इस्लाम धर्माचं पालन करतो. युरो कपच्या कालच्या (16 जून) सामन्यात फ्रान्सनं जर्मनीला 1-0 असं हरवलं होतं.
आदल्या दिवशीच पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं कोका कोलाची बाटली बाजूला सारत पाण्याची बाटली उचलली होती, त्याचा परिणाम कोका कोलाच्या शेअर्सवरही झाला होता. त्यानंतर पोग्बानं काहीशी तशीच भूमिका घेतलेली दिसली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)