कोरोना लस सांगून मुंबईच्या सोसायटीत खोटी लस दिल्याचा आरोप

Published

मुंबईच्या हिरानंदानी हेरिटेजमधील 390 रहिवाशांनी सोसायटीत एका कँपमध्ये लशी टोचून घेतल्या.

आता मात्र त्या लशी खोट्या होत्या आणि हा एक घोटाळा आहे, असा त्यांनी आरोप केलाय.

1260 रुपये प्रति लस या दराने 390 जणांनी या लशी घेतल्या. मात्र कुणालाही दुष्परिणाम न झाल्याने अनेकांनी शंका उपस्थित केल्या.

नंतर वेगवेगळ्या रुग्णालयांमधून प्रमाणपत्र उशिराने मिळाल्याने या शंका खऱ्या ठरू लागल्या.

नानावटी रुग्णालयानेसुद्धा असं लसीकरण कुठेही न घेतल्याचं म्हटलंय. मुंबई पोलीस हे कँप आयोजित करणाऱ्या दोघांची चौकशी करत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)