भारत-चीन सीमावाद: क्वाड समूहातला भारताचा वाढता सहभाग चीनला का खुपतोय?

व्हीडिओ कॅप्शन, भारत-चीन सीमावा: क्वाड समुहातला भारताचा वाढता सहभाग चीनला का खुपतोय?
Published

गेल्या वर्षी 15 जून 2020ला भारत आणि चीनच्या सैन्यात लडाख सीमेवर झटापट झाली होती. त्यामध्ये 20 भारतीय सैनिक तर 4 चिनी सैनिकांचा मृत्यू झाला होता. सीमेच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांत अनेक वर्षांपासून वाद आहे.

पण गेल्या 4 दशकांतला हा सगळ्यांत मोठा संघर्ष होता. या घटनेच्या काही महिन्यानंतर ऑक्टोबर 2020मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री आणि क्वाड समूहाच्या परराष्ट्र मंत्री यांच्यात टोकियोमध्ये भेट झाली.

नोव्हेंबर 2020मध्ये क्वाड देशांच्या नौदलांनी बंगालच्या खाडीत सरावही केला. यावर्षी मार्चमध्ये क्वाड देशांनी मोठी पावलं उचलली आहेत. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या समूहाला क्वाड समूह म्हटलं जातं.

या 4 देशांच्या प्रमुखांनी एका शिखर संमेलनात भाग घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ते संमेलन आयोजित केलं होतं. गेल्यावर्षी लडाखमध्ये चिनी सैन्यासोबत संघर्ष शिगेला पोहोचल्यानंतर भारताने क्वाडमध्ये भागीदारी वाढवल्याचं दिसत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)