सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? 5 तपास यंत्रणांच्या हाती काय लागलं?

व्हीडिओ कॅप्शन, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? 5 तपास यंत्रणांच्या हाती काय लागलं?
Published

14 जून 2021...बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होईल. पण, अजूनही एक प्रश्न अनुत्तरितच आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?

मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय (CBI), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि अंमलबजावणी संचलनालय (ED) या पाच यंत्रणांनी सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी केली. पण, तपासात हाती काय लागलं?

मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचं समोर आलं, तर सीबीआय तपासाबाबत अजूनही मौन बाळगून आहे. NCB चा तपास बॉलीवूडमधील ड्रग्ज सिंडिकेटच्या दिशेने सुरू आहे, असं सांगितलं जात आहे.

अंमलबजावणी संचलनालयाला आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळालेले नाहीत. या तपास यंत्रणांनी वर्षभरात कोणत्या दिशेने चौकशी केली? तपास कुठपर्यंत आलाय? आपण जाणून घेऊया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)