आदर्श घरभाडे कायद्यामुळे फायदा कुणाचा? घरमालक की भाडेकरू? | सोपी गोष्ट 353

व्हीडिओ कॅप्शन, आदर्श घरभाडे कायद्यामुळे फायदा कुणाचा? घरमालक की भाडेकरू? | सोपी गोष्ट 353
Published

शहरी भागांत 28% कुटुंबं ही भाड्याने राहतात. त्यामुळे घर भाड्याने देण्याची बाजारपेठही मोठी आहे. पण, यात घरभाडं नेमकं किती आकारायचं आणि भाडेकरूने भाडं थकवलं तर त्यावर कारवाई काय करायची याविषयीची स्पष्टता भाडेवाढ नियंत्रण कायद्यात नव्हती.

यावर आता केंद्र सरकारने आदर्श घरभाडे कायदा तयार केला आहे. नुकतीच मंत्रिमंडळाने या मसुद्याला संमती दिली. नव्या सर्वसमावेशक कायद्यात घरमालक आणि भाडेकरू यांच्यासाठी नियमावली देण्यात आली आहे. तसंच तंटे सोडवण्यासाठी नवीन प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. जाणून घेऊया आदर्श घरभाडे कायद्याविषयी सोपी गोष्टमध्ये...

संशोधन- ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)