कोरोना : ग्रामीण भारतात काय परिस्थिती? बिहारच्या खेड्यातून घेतलेला आढावा

Published

भारतात कोव्हिड 19मुळे आतापर्यंत तीन लाखांच्यावर लोकांचा मृत्यू झालाय. यातही आताचा मे महिना देशासाठी जास्तच जीवघेणा ठरला.

सरासरी एका दिवशी चार हजार लोकांचा मृत्यू या महिन्यात होत होते. हा आकडा घाबरवणारा आहेच. पण कदाचित वस्तुस्थितीला धरून नाही. म्हणजे असं, की हा नोंद झालेल्या अधिकृत मृतांचा आकडा आहे. पण भारतातील खेडोपाड्यांमध्ये कोरोना निदान चाचण्यांच्या शिवाय झालेले कितीतरी मृत्यू यात धरलेलेच नाहीत.

देशाच्या दुर्गम खेड्यांमध्ये नेमकी कोरोनाची परिस्थिती काय आहे, याचा बीबीसीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी ऑर्ला गॉरिन यांनी बिहारच्या एका खेड्यातून घेतलेला आढावा...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)