कोरोना तिसऱ्या लाटेतून लहान मुलांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र कसा सज्ज होतोय?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना तिसऱ्या लाटेतून लहान मुलांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र कसा सज्ज होतोय?
Published

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसारख्या महानगरांमध्ये लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्याचं काम सुरू झालंय.

या सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर आणि नवजात अतिदक्षता विभाग (NICU) असणार आहेत.

कोरोनाग्रस्त लहान मुलांवर उपचार कसे करायचे, याबाबत मार्गदर्शनासाठी सरकारने नऊ बालरोगतज्ज्ञांची टास्कफोर्स तयार केलीय. बालरोगतज्ज्ञांच्या या टास्कफोर्सने सरकारला दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बालरोगतज्ज्ञ, औषध, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज हे प्रमुख मुद्दे मांडले आहेत. याबाबत कुठे किती काम झालं आहे? आणि काय काम सुरू आहे?

वार्तांकन - मयांक भागवत

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)