जेरुसलेम हिंसाचार - इस्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये का होतोय पुन्हा संघर्ष? । सोपी गोष्ट 366
एकीकडे अख्खं जग कोव्हिडचा सामना करत असताना मध्य-पूर्व आशियातल्या गाझा पट्टीत आणि जेरुसलेममध्ये वेगळाच संघर्ष सुरू झालाय.
इस्रायल गाझा पट्टीतली 13 मजली हनाडी टॉवर ही इमारत पाडल्यानंतर हमास या कट्टरतावदी संघटनेनं इस्त्राएलच्या दिशेनं 130च्या वर रॉकेट्स डागली.
आणि यात तेल अवीव हे इस्त्राएलचं महत्त्वाचं शहरही त्यांनी सोडलं नाही. या सगळ्यात आतापर्यंत तीसच्यावर नागरिकांचा जीव गेलाय. जेरुसलेम या धार्मिक स्थळावरून ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांमधला वाद पुरातन आहे. त्यातच ऐन ईदच्या सणाला कोणती नवी ठिणगी पडली, सध्या हा परिसर अशांत का आहे, समजून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)