You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेत एवढा मोठा सायबर हल्ला झाला की तिथं आणीबाणी घोषित करावी लागली
अमेरिका ही जगातील एक महासत्ता आहे. पण आज एका मोठ्या हल्ल्यातून अमेरिका स्वतःचा बचाव करतेय. अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या सरकारी इंधन पाईपलाईनवर सायबर हल्ला झालाय. हा हल्ला इतका मोठा होता की देशात आणीबाणीची घोषणा केली गेलीये.
कोलोनियल पाईपलाईन असं या अमेरिकन सरकारी कंपनीचं नाव आहे. तर डार्कसाइड या सायबर गुन्हेगार टोळीने त्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय. कोलोनियल पाईपलाईनमधून दररोज 25 लाख बॅरल तेल जातं.
अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीच्या राज्यांमध्ये डिझेल, गॅस आणि जेट इंधनांची 45 टक्के गरज या पाईपलाईनच्या माध्यमातून पूर्ण होते. हल्ल्यानंतर कंपनीनं आपलं नेटवर्क ऑफलाईन म्हणजेच बंद केलं असून पाइपलाइनच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे.
पण हा हल्ला नेमका कुठून आणि कसा झाला? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)