दलित क्रिकेटर बाळू पालवणकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात निवडणूक का लढवली?
अस्पृश्य म्हणून शतकानुशतं हिणवलेल्या समाजाला बाळू पालवणकरांनी क्रिकेटच्या मैदानात प्रतिष्ठा मिळवून दिली. क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बदलाची मुहुर्तमेढ रोवली.
बाळूंसह त्यांच्या भावांनी मिळून भारतीय क्रिकेटला मोलाचं योगदान दिलं. खेळणं थांबवल्यानंतर बाळूंनी सामाजिक कार्यातही वाटा उचलला. बाळूंच्या कर्तृत्वाला दाद म्हणून मुंबईतल्या प्रभादेवी भागातील एका रस्त्याला पी.बाळू हे नाव देण्यात आलं आहे. पी. बाळू यांच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा 2017मध्ये करण्यात आली होती. मात्र तूर्तास तरी हा चित्रपट प्रत्यक्षात साकारलेला नाही.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)