You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंढरपूर निवडणूक उद्धव ठाकरे सरकारसाठी इतकी महत्त्वाची का आहे?
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे हे दिसत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊन सदृश्य नियम जाहीर केले. परंतु कोरोनाच्या या नियमांसाठी पंढरपूरचा अपवाद करण्यात आला आहे. हे नियम या मतदारसंघात लागू करण्यात आलेले नाहीत.
निवडणुकीसाठी जरी या पंढरपूर मतदारसंघात नियमावली लागू नसली तरी प्रचारामुळे इथं कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सगळे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यात कोणत्याही पक्षाचा अपवाद नाही. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके तर भाजपचे समाधान आवताडे यांच्यात ही मुख्य लढत होतेय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)