महाराष्ट्र लॉकडाऊननंतर दिल्लीनेही उचललं 'हे' पाऊल

Published

महाराष्ट्रानंतर दिल्लीनेही संचारबंदीचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रानंतर दिल्लीनेही संचारबंदीचा निर्णय घेतलाय. शनिवारी आणि रविवारी दिल्लीत संचारबंदी असेल.

अत्यावश्यक सेवेतील लोकांना कर्फ्यू पास मिळेल. लग्नासाठी जाणाऱ्या लोकांनाही हा पास दिला जाणार आहे. मॉल, जीम, स्पा, सभागृह पूर्णपणे बंद राहणार आहे.

तर सिनेमा हॉल 30 टक्के क्षमतेने चालू राहतील. काही ठिकाणी आठवडे बाजार चालू राहतील. रेस्टॉरंट केवळ होम डिलिव्हरी करू शकतील. दिल्लीमध्ये सध्या बेडची कमतरता नाही, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

दिल्लीत गेल्या काही दिवसांत झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. दिल्लीत बुधवारी 17 हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)