कोरोना: ऑक्सिजन न मिळाल्याने मुंबईच्या नालासोपारा येथे 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईच्या नालासोपार येथे 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू
Published

मुबंईतल्या नालासोपारा येथे ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर न झाल्याने 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

इथल्या विनायक हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. मृतांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल स्टाफ यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आलं.

दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्याची गाडी वेळेवर पोहोचली होती, असा पोलिसांचा दावा आहे.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)