You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात 25 वर्षांवरील वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण शक्य होईल का? सोपी गोष्ट 311
भारतात कोरोनाची सुरुवात होऊन आता एक वर्ष उलटून गेलंय. पण पहिली लाट जाते ना जाते तोच दुसरी लाट धडकलीये. गेल्या 24 तासात देशात एकूण 1,15,436 रुग्णांची नोंद झालीये.
गेल्या वर्षभरातील देशातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे, तर त्यातले 55,469 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडलेत. म्हणजे देशातील रुग्णसंख्येच्या जवळपास 50% रुग्ण महाराष्ट्रात सापडतायत. हे आकडे सांगण्याचं कारण म्हणजे, एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय की, राज्यात कोरोनाचा इतका कहर आहे मग सरसकट लसीकरण का केलं जात नाहीये? लसीकरणासाठीची वयोमर्यादा पाळणं खरंच गरजेचं आहे का?
महाराष्ट्र सरकारनं तशी विनंती केंद्राकडे केलीये. पण त्यावर केंद्र सरकारचं, आरोग्य तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? आणि असं सरसकट लसीकरण योग्य आहे का? याचविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - सरोज सिंह, मयुरेश कोण्णूर
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)