You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्लादिमीर पुतिन यांनी रशियन राजकारणावर पकड कशी मिळवली? सोपी गोष्ट 310
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहू शकणार आहेत. एका घटनादुरुस्तीमुळे पुतिन यांना हे शक्य होणार आहे.
36मध्ये पुतिन 83 वर्षांचे असतील. तोपर्यंत ते निवडणुका जिंकत राहिले आणि प्रकृतीनेही साथ दिली तर ते सर्वोच्च पदावर राहू शकतील. आणि त्यांनी तोपर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण केला तर ज्येष्ठ नेते स्टॅलिन यांना मागे टाकून ते रशियातले सगळ्यात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले नेते असतील. आहे ना विलक्षण?
मूळात पुतिन हे साधंसुधं व्यक्तिमत्व नाहीच आहे मूळी. आंतरराष्ट्रीय राजकारणातला त्यांचा दबदबा आणि रशियातली त्यांची माचोमॅनची प्रतिमा असं सगळंच विलक्षण आहे. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये व्लादिमीर पुतिन या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊया.
संशोधन - टीम बीबीस, ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)