सुएझ कालव्यात ‘एव्हर गिव्हन’ बोट कशी अडकली? । सोपी गोष्ट 303

Published

दोन लाख टन वजनाचं तैवानी कंपनीचं ‘एव्हरगिव्हन’ हे जहाज मंगळवारी जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात अडकलं. आता पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जहाज बाहेर काढण्यात आलं आहे.

पण तोपर्यंत सुएझच्या कालव्यात चक्क ट्रॅफिक जाम झाला होता. पर्यायी कालव्यातून तात्पुरती वाहतूक सुरू झाली असली तरी सध्या तीसहून अधिक जहाजं अजून अडकून पडली आहेत. आशियाला युरोपशी जोडणारा हा महत्त्त्वाचा जलमार्ग आहे.

आणि तिथेच ट्रॅफिक जाम झाल्यामुळे जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान होतंय. पण बोटीचा हा अपघात घडला कसा, त्याचे काय परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत, पाहूया सोपी गोष्टमध्ये..

संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके

लेखन,निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)