अमेरिकेतल्या या राज्यात गरिबांसाठी लस का राखून ठेवली जात आहे?
Published
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी येत्या मे महिन्यापर्यंत अमेरिकेतील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला कोरोनाविरोधातली लस मिळेल, असं आश्वासन दिलंय.
लसीकरणाची मोहिम राबवण्यात अमेरिकेतल्या काही राज्यांनी चांगल्या उपाययोजना सुचवल्या आहेत. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेवीन न्यूसॉम यांनी राज्यातल्या वंचित समुहातील लोकांसाठी 40 टक्के लस राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कोरोना संसर्गाचा वेग मंदावला जाईल आणि निर्बंध उठवून व्यवहार लवकरात लवकर सुरु करता येतील, असं त्यांनी म्हटलंय.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)