कबड्डीमध्ये महिलांचा सहभाग एवढा जास्त का आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कबड्डीमध्ये महिलांचा सहभाग एवढा जास्त का आहे?
Published

भारतात कबड्डी लोकप्रिय आहेच, पण त्यात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून हा सहभाग आणखी वाढण्याचीही संभावना आहे. खेळात महिलांच्या सहभागाच्या बाबतीत कबड्डी सर्वात आघाडीवर असल्याचं गेल्या वर्षी बीबीसीनं केलेल्या एका संशोधनातून समोर आलं होतं. पण त्यामागची कारणं काय असावीत? महिलांना कबड्डीमध्ये एवढा रस का वाटतो? बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर पुरस्काराच्या निमित्तानं आमचे प्रतिनिधी, जान्हवी मुळे आणि दलजीत अमी यांनी या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला.

रिपोर्टर - जान्हवी मुळे, दलजीत अमी

कॅमेरा - शाहिद शेख, केन्झ उल मुनीर, मंगलजीत सिंग

एडिटिंग - केन्झ उल मुनीर

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)