You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहित दलाल: मराठी तरुणांना नोकरी मिळावी म्हणून दिवसरात्र झटणारा इंजिनियर
मराठी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी रोहित दलाल हा तरुण प्रयत्न करतोय. रोहितचं मुळ गाव परभणी. मात्र तो सध्या नवी मुंबईतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतोय.
2016ला रोहितचं इंजिनिअरींगचं शिक्षण पुर्ण झालं. मात्र नोकरी मिळवण्यासाठी त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. आपल्याला आलेल्या अडचणी इतरांना येऊ नये म्हणून त्याने मराठी नोकरी हा उपक्रम सुरू केला.
विविध सोशल मिडीया अकाऊंट्सच्या माध्यमातून मराठी तरुणांसाठी तो नोकरीविषयक जाहिराती पोस्ट करतो. त्याच्या या पोस्ट्सना तरुण तरुणींचा चांगला प्रतिसादही मिळतो.
"मी हे सर्व केवळ आवड म्हणून करतो. त्याची कोणहीही कन्सल्टन्सी नाही किंवा मी कोणाकडूनही यासाठी पैसे घेत नाही", असं तो सांगतो.
लॉकडाऊन दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्या काळात मराठी नोकरीच्या माध्यमातून बोरिवलीतील दिव्याला नोकरी मिळाली. सोशल मिडियाचा वापर तरुणांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंटसाठी करून घ्यावा, असं रोहितला वाटतं. 2020या कठीण वर्षांत रोहितच्या या उपक्रमामुळे 55 पेक्षा जास्त तरूणांना नोकरी मिळाल्याचं रोहितने ट्वीट करून सांगितलंय.
व्हीडिओ रिपोर्ट - राहुल रणसुभे, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)