महाराष्ट्र विधानसभेत विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळावरून खडाजंगी का झाली?
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘वैधानिक विकास महामंडळां’वरून विरोधक आणि सरकारमध्ये खडाजंगी झाली. विकास महामंडळाच्या नेमणुका करण्यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारत होता.
पण अर्थमंत्र्यांनी बोलताना राज्यपालांनी आधी 12 आमदारांची नावं विधानपरिषदेसाठी संमत करावी आणि लगेचच आम्ही या नेमणुका करू असं म्हटल्यानंतर भाजपने सरकैर विदर्भ मराठवाड्याला ओलीस धरतंय असा आरोप केला.
काय आहेत ही मंडळं? त्यांचा राज्यपालांशी संबंध काय? या सगळ्यामागे काही राजकारण आहे का? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)