हा 9 वर्षांचा शिक्षक युद्धग्रस्त भागातील शाळेत असा शिकवतो

Published

येमेनच्या ताईझ शहरात सरकार आणि हौथी बंडखोरांमध्ये अजूनही संघर्ष सुरु आहे. अशा वातावरणात एका पडझड झालेल्या शाळेत अहमद नावाचा नऊ वर्षांचा मुलगा आपल्यापेक्षा लहान मुलांना अभ्यासाचे धडे देतोय.

आजूबाजूला धोकादायक परिस्थिती असूनही शंभरहून अधिक मुलं या शाळेत येतात. जेव्हा शिक्षक शाळेत येत नाहीत तेव्हा अहमद त्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतो. युनिसेफच्या म्हणण्यानुसार येमेनमधल्या प्रत्येकी पाच शाळांपैकी एक शाळा बंद पडली आहे. पण असं असलं तरी ताईझ मधली ही शाळा पडझड झालेल्या अवस्थेतही सुरु झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)