स्वप्ना बर्मननं कसं साकार केलं एशियाडमध्ये सुवर्ण पदकाचं स्वप्न? #BBCISWOTY

Published

एक रिक्षा चालक आणि चहाच्या मळ्यात काम करणारी कामगार यांची मुलगी असलेली स्वप्ना बर्मन पहिल्यांदा मैदानात खेळायला उतरली तेव्हा तिचं लक्ष्य नोकरी होतं.

पदक मिळवणं तिची पहिली प्राथमिकता नव्हती. पण हे पाऊल यशाच्या मार्गातलं पहिलं पाऊल ठरेल याची तिला कल्पनाही नव्हती.

गुणवत्ता, मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तिनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. तेही अशा खेळात, ज्यात एक नाही, तर सात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. जे जिंकण्याचा निर्धार करतात, त्यांना यश मिळतंच, याचं स्वप्ना हे उत्तम उदाहरण आहे.

(हा रिपोर्ट बीबीसीच्या ‘द इंडियन चेंजमेकर्स’ मालिकेचा भाग आहे, ज्यात आम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या प्रेरणादायी महिला खेळाडूंच्या प्रवासाची कहाणी मांडतो आहोत.)

Credits:

रिपोर्टर – देबालिन रॉय

कॅमेरा आणि एडिटिंग - देबालिन रॉय आणि रुबैयत बिस्वास

निर्मिती – दीपक शर्मा

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)