दिव्या काकरान : कुस्तीत मुलांनाही हरवणारी पैलवान
22 वर्षांची पैलवान दिव्या काकरान भारताच्या उगवत्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी तिनं कुस्तीमध्ये आशियाई विजेतेपद पटकावलं होतं.
दिव्याला गरिबीमुळे संघर्ष करावा लागला आणि कुस्तीसारख्या पुरुषप्रधान खेळात सहभागी झाल्यामुळे गावात भेदभावालाही सामोरं जावं लागलं. पण पदकामागून पदकं जिंकत तिनं सगळ्या विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
रिपोर्टर - वंदना
कॅमेरा आणि एडिटिंग – प्रेम भूमिनाथन
(हा रिपोर्ट बीबीसीच्या ‘द इंडियन चेंजमेकर्स’ मालिकेचा भाग आहे, ज्यात आम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या प्रेरणादायी महिला खेळाडूंच्या प्रवासाची कहाणी मांडतो आहोत.)

हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)