You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दुबईची राजकन्या गायब होण्यामागचं गूढ
तिला त्यांनी बळजबरीने ताब्यात घेतलं, मग छळ केला आणि तिला धमक्याही दिल्या. नाही! ही कादंबरी नाही आहे. गेल्यावर्षी लंडनमधील उच्च न्यायालयाने दुबईचे राजा शेख महम्मद बिन रशीद अल मख्तुम यांच्वावरील त्यांच्या दोन मुलींना जबरदस्तीने ताब्यात घेऊन मायदेशी बंदिवासात डांबून ठेवल्याचा आरोप मान्य केला होता. त्यातील एक मुलगी लतिफा यांनी दुबईच्या त्यांच्या घरातून पळून जाण्याचा दोनदा प्रयत्न केला.
पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना तीन वर्षांसाठी तुरुंगात डांबलं. त्यानंतर जेव्हा समुद्रमार्गे पळून जाताना तिला पुन्हा पकडलं, तेव्हा तिला सक्त नजरकैदेत ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर अलीकडे ही राजकन्या गायब झाली आहे.
पण त्यापूर्वी या राजकन्येनं आपल्याकडच्या एका गुप्त मोबाईल फोनने ती ज्या परिस्थितीत जगतेय त्याचं चित्रण जगासमोर आणलं होतं. त्याविषयीचा बीबीसीचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)