टूलकिट म्हणजे काय?दिशा रवी यांना अटक झाली ते प्रकरण काय आहे? । सोपी गोष्ट 274

Published

पर्यावरणवादी नेत्या दिशा रवी यांना ‘टूलकिट प्रकरणी’ दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

"ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना केलेल्या ट्विटच्या टूलकिट एडिटर दिशा रवी होत्या. आणि या टूलकिटच्या माध्यमातून खलिस्तानी चळवळीशी संबंधित भारताविरोधात द्वेष पसरवणारा संदेश पसरवण्याचा त्यांचा उद्देश होता," असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणामुळे टूलकिट हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आज सोपी गोष्टमध्ये तेच समजून घेणारोत. शिवाय जाणून घेणार आहोत टूलकिट प्रकरणाविषयी...

संशोधन- टीम बीबीसी

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)