You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्या ट्वीट्सची ठाकरे सरकार चौकशी करू शकतं का? #सोपीगोष्ट 270
रिहाना आणि ग्रेटा थनबर्गच्या ट्वीट्सनंतर शेतकरी आंदोलन सोशल मीडियावरचा टॉप ट्रेंड बनलं. अनेक भारतीय सेलिब्रिटींनीही मग परदेशी सेलिब्रिटींची ही टिप्पणी धुडकवून लावत भारतीयांनी एकत्रितपणे यावर तोडगा काढायला हवा असं म्हटलं.
यातल्या अनेक ट्वीट्सची भाषा सारखीच होती म्हणून भाजपने या सेलिब्रिटींवर दबाव आणला का याची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी ठाकरे सरकारने मान्य केली. पण मुळात ट्वीट्सची भाषा सारखी आहे म्हणून त्यांची चौकशी करता येते का? त्याविरोधात गुन्हा दाखल करता येतो का?
चौकशीमागे राजकारण आहे का? पाहा हा व्हीडिओ.
सविस्तर बातमी -
https://bbc.com.im/marathi/india-55986927
संशोधन- दीपाली जगताप
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)