You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना उद्रेकाच्या काळात या प्राणीमित्राने वाचवले 10,000 प्राण्यांचे जीव
चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आणि शहरात कडक लॉकडाऊन लागलं. त्यामुळे अनेकांना आपल्या घरी परतही जाता आलं नाही. आणि त्यांच्या राहत्या घरातले पाळीव प्राणी घरांमध्ये अडकले. त्यांची काळजी घेणारं कुणीच नव्हतं. अशावेळी ड्यू फॅन या प्राणीमित्राने या लोकांना आणि पाळीव प्राण्यांनाही मदत केली.
फॅन वुहान स्मॉल अॅनिमल्स प्रोटेक्शन असोसिएशन चालवतात. आणि त्यांच्याशी संपर्क साधलेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या पाळीव प्राण्यांना अन्न आणि निवारा देण्याचं काम त्यांनी केलं. अशा तब्बल दहा हजार प्राण्यांचा त्यांनी जीव वाचवला असंच म्हणावं लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)