जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सुरू झालं 4G इंटरनेट, पण, लोक अजूनही नाराजच
जम्मू काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवेवर असलेली बंदी केंद्रसरकारने उठवली आहे. पण, तरुण आणि उद्योजकांमध्ये त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्या घेतल्या सरकारने इथले फोन, वायरलेस फोन आणि इंटरनेट सेवाही बंद केली होती.
पुढे टप्प्या टप्प्याने दूरध्वनी, वायरलेस, टूजी आणि थ्रीजी पाठोपाठ आता हायस्पीड इंटरनेट सेवाही पूर्ववत केली आहे.
सोशल मीडियावर ‘फेक न्यूज’च्या माध्यमातून चुकीची माहिती पसरू नये म्हणून इंटरनेट बंद केल्याची सरकारची भूमिका आहे.
तर काश्मिरी लोकांना ऑनलाईन अभ्यास आणि फॉर्म भरणंही कठीण गेल्यामुळे विद्यार्थी आणि उद्योजक चिडलेले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)