म्यानमार लष्करी बंडः ती एरोबिक्स करत असताना मागून लष्करी गाड्या गेल्या आणि...
Published
एरोबिक्स ट्रेनर खिंग हिन वाई यांना जराही कल्पना नव्हती की, नेहमीप्रमाणे त्या शूट करत असलेला व्हीडिओ जगभरात व्हायरल होईल. त्या व्हीडिओ करत असताना मागून लष्कराच्या गाड्यांचा मोठा ताफा म्यानमारच्या संसदेच्या दिशेनं गेला. आणि तिथेच त्यांनी आँग सांग स्यू ची यांना अटक करून सत्ता ताब्यात घेतली. म्हणूनच हा व्हीडिओ सध्या जगभरात पाहिला जात आहे. ट्रेनर खिंग म्हणतात, की त्यांना अशी काही कारवाई सुरू असल्याची कल्पनाही नव्हती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)