कोरोनाची लक्षणं वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी का दिसतात?

Published

गेले अनेक महिने केंब्रिज विद्यापीठातले संशोधक शेकडो कोव्हिड रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तुलना करत आहेत. काही लोक कोव्हिडमुळे खूप आजारी पडतात आणि काही लोक नाही, असं का बरं होतं याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

अभ्यास केलेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं होतं आणि इतरांना कुठलीच लक्षणं नव्हती. आणि त्या नमुन्यांमध्ये कमालीचे फरक असलेले पाहायला मिळाले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)